ICHMH51NEWS.IN
9921600800

विकासाच्या मुद्द्यावर बोलता येत नसल्याने व्यक्तिगत टीका-राहुल आवाडे. कबनुरकरांचे आवाडेना पाठबळ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विकासाच्या मुद्द्यावर बोलता येत नसल्याने व्यक्तिगत टीका-राहुल आवाडे. कबनुरकरांचे आवाडेना पाठबळ
कबनूर –
आजवर ज्यांनी काहीच विकासकामे केली नाहीत, ते विकासकामांच्या गप्पा मारत आहेत. विरोधकांकडे विकासाचा मुद्दाच नसल्याने ते केवळ व्यक्तीगत टीका करत आहेत. याउलट महायुती सरकारच्या काळात इचलकरंजीत विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देत आमदार प्रकाश आवाडे यांनी कायापालट केला. प्रगतीची ही विकासगंगा अशीच सुरु रहावी यासाठी सर्वांनी मला मतांचा आशिर्वाद देऊन विक्रमी मत्ताधिक्याने विधानसभेत पाठवावे, असे आवाहन राहुल आवाडे यांनी केले.
महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ कबनूर येथे प्रमुख पदाधिकारांच्या उपस्थितीत प्रचार पदयात्रा काढण्यात आली. त्याप्रसंगी राहुल आवाडे बोलत होते. कबनूरातील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौक येथे नारळ फोडून भव्य प्रचार पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.  यावेळी राहुल आवाडे यांनी ग्रामदैवत जंदीसाहेब व ब्रॉनसाहेब यांचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले.
या प्रचार पदयात्रेला संपूर्ण कबनूर गावातून उदंड प्रतिसाद लाभला. पदयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी राहुल आवाडे यांचे औक्षण करत जल्लोषात स्वागत केले. कबनूरातील विविध विकासकामांसाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करुन देतानाच येथील पाण्याचा प्रश्‍नही निकालात काढला. ते करताना ग्रामस्थांवर कोणताही आर्थिक भुर्दंड पडू दिला नाही. भविष्यातही अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देत गावाचा कायपालट करुया, असे आवाहन केले.
महायुतीच्या आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळविण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असून कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि नागरिकांच्या समर्थनामुळे या प्रचार पदयात्रेने स्थानिक राजकारणात नवीन ऊर्जा भरली असल्याचे मत विविध मान्यवरांची आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी भाजपचे प्रमुख पदाधिकारी, महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कबनूर सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ, बुथ कमिटी मेंबर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा