मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे विरोधक हवालदिल-सौ मौश्मी आवाडे
इचलकरंजी –
राज्यातील महायुती सरकारने राबविलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य व बळ मिळाले आहे. परंतु या योजनेला महिला वर्गातून मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. महायुती सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना बळ देण्याचे काम केले आहे. पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेत येण्यासाठी भाजपाचे उमेदवार राहुल आवाडे यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करावे, असे आवाहन सौ. मौश्मी आवाडे यांनी केले आहे.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने सौ. मौश्मी आवाडे यांनी ‘मतदाराशी थेट भेट’ च्या माध्यमातून प्रत्यक्ष गाठीभेटीवर अधिक भर दिला आहे. विशेषत: त्यांनी महिला वर्गाला एकजुट करत महायुती सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या व भविष्यात राबविल्या जाणार्या योजनांबद्दल सविस्तर माहिती देत आहेत. महायुतीचेच सरकार का? हे पटवून देत असून त्यांना महिला वर्गातून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
जिल्हा परिषद सदस्य असताना राहुल आवाडे यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे तसेच आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गत पाच वर्षात इचलकरंजी विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी आणलेल्या महत्वाकांक्षी योजनांसह भविष्यातील व्हिजन संदर्भात माहिती दिली जात आहे. जनतेच्या पाठबळावरच राहुल आवाडे यांचा विजय निश्चित आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रत्यक्ष गाठी-भेटी घेतल्या त्याठिकाणी प्रत्येकाने आवाडे परिवाराने केलेली विकास कामे दिलेले सहकार्य या गोष्टी अनेकांनी बोलून दाखविल्या. त्यांचा तो आत्मविश्वास हाच आमचा विजय आहे. राहुल आवाडे राज्यातील सर्वाधिक मत्ताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही सौ. मौश्मी आवाडे यांनी व्यक्त केला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







