राहुल आवाडे तरुणांसोबत वृद्धांचाही आधार ठरेल-सुरेश हाळवणकर
इचलकरंजी –
तरुणांचा साथीदारसोबत आता वृध्दांचा आधार अशी भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांची नवी ओळख निर्माण होईल, अशी आशा व्यक्त करताना भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा आणि महायुतीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी राहुल आवाडे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडीचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री. हाळवणकर बोलत होते. ते म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांचा घरात आणि नातेवाईकांच्यात मोठा प्रभाव असतो. त्याचा उपयोग करून भाजपाचे उमेदवार राहुल आवाडे यांना जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
आमदार प्रकाश आवाडे यांनी, शासनाच्या विविध योजना सर्वांच्यापर्यंत पोहचविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्याचा प्रत्यक्ष लाभही मिळवून दिला आहे. या योजना अशाच सुरु राहण्यासाठी ज्येष्ठांनी आपले मतरुपी आशिर्वाद राहुल आवाडे यांना द्यावेत, असे सांगितले.
राहुल आवाडे यांनी, ज्येष्ठांचे पाठबळ आणि मार्गदर्शन असेल तर कोणते काम सोपे होऊन जाते. म्हणून मलाही ज्येष्ठांनी भक्कम पाठबळ द्यावे, असे आवाहन करत ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात नाना-नानी पार्क उभारणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वृध्दापकाळ देण्यात येणारी पेन्शन घरपोच मिळण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन, असे सांगितले.
याप्रसंगी शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, पांडुरंग महातुकडे यांचीही भाषणे झाली. मेळाव्यात वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, वसंत पवार, दीपक कडोलकर, बंडोपंत लाड, श्रीमती शशिकला पाटील, प्रल्हाद सूर्यवंशी, दौलत पाटील, राजेश रजपुते, उदय धातुंडे आदींसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








