सर्वांगीण विकासात अग्रेसर ब्राम्हण समाज राहुल आवाडेंच्या विजयासाठी पाठबळ द्यावे-आ.शशिकला जोल्ले
इचलकरंजी –
देशाच्या सर्वांगिण विकासामध्ये ब्राह्मण समाजाचे योगदान मोलाचे आहे. अगदी इतिहासकाळापासून ब्राह्मण समाजाने योगदान दिले आहे. वस्त्रनगरीच्या जडणघडणीतही हा समाज सदैव अग्रस्थानी राहिला आहे. चांगल्या कामासाठी पाठबळ देणार्या ब्राह्मण समाजाने राज्यात महायुतीचे सरकार येण्यासाठी राहुल आवाडे यांना भक्कम पाठबळ देऊन त्यांना लोकप्रतिनिधीत्व करण्यासाठी विधानसभेत पाठवावे, असे आवाहन कर्नाटकच्या माजी मंत्री तथा आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी केले.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील भाजपाचे अधिकृत उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने किरण दंडगे यांच्या निवासस्थानी स्नेहमेळावा पार पडला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सौ. जोल्ले बोलत होत्या. याप्रसंगी आमदार प्रकाश आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. वेदपाठशाळेचे विश्वस्त दिगंबर कुलकर्णी यांनी स्वागत तर प्रास्ताविक युवा अध्यक्ष कल्पेश दंडगे यांनी केले. स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून राहुल आवाडे यांना भक्कम समर्थन दिले गेले.
यावेळी विविध मान्यवरांनी राहुल आवाडे यांचे कार्य आणि त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाची प्रशंसा करताना यापुढे त्यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीतील सर्वांगीण विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले जाईल. त्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी राहू, असे सांगितले. उमेदवार राहुल आवाडे यांनी ब्राह्मण समाजाचे इतिहासातील योगदान आणि इचलकरंजीच्या प्रगतीतील सहभाग असल्याचे सांगत मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासोबतच समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबध्द राहू, अशी ग्वाही दिली.
यावेळी ब्राह्मण सभा अध्यक्ष बंडोपंत जोशी, वेद पाठशाळेचे अध्यक्ष मनोज निगुडकर, सेक्रेटरी संजय मैंदर्गी, स्वानंद फडणीस, रमा फाटक, किशोरी दंडगे यांच्यासह समाजातील प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते. आभार शैलेश गोरे यांनी मानले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800