माजी नगरसेवक इम्रान हावेरी यांचा मदन कारंडेना पाठिंबा.
इचलकरंजी :
शहापूर कृष्णानगर येथील माजी नगरसेवक इम्रान बशिर हवेरी यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना जाहीर पाठिंबा दिला. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये हवेरी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. पाठिंबा नंतर कृष्णानगर परिसरामध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. प्रचार रॅलीमध्ये कारंडे यांचा विजयाचा जयघोष केला.
माजी नगरसेवक इम्रान हावेरी, महेश कोरे, सदानंद कांबळे, रियाज मुल्ला,, मेहबूब मोमीन, संतोष गौंड, संतोष जाविर, मेहबूब आणुरी, रफिक बागणीवाले, इम्तियाज मुल्ला, इम्रान सोनेखान, जुबेर मुल्ला, इनुस सवदागर, केममपंना कांबळे, बशीर मोमीन, शहनुर मुल्ला आदींसह हवेरी यांना मानणारा गट व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








