गृह मतदानाची सोय नाकारत जनजागृतीसाठी अँड प्रिती पटवा यांचे मतदान केंद्रावर मतदान.
इचलकरंजी
इचलकरंजी येथील अँड प्रिती प्रकाश पटवा यांनी आज मतदान जनजागृती साठी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.पटवा या कित्येक वर्षांपासून एका जागेवर स्थिर आहेत.शरीराचा काही भागच काम करत असल्याने शासकीय नियमानुसार त्यांना गृह मतदानाची सोय होती.परंतु मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून सर्व नागरिकांनी ते बजावावे यासाठी त्यांनी गृह मतदानाचा पर्याय नाकारत स्वतः मतदान केंद्रात जाऊन मतदान केले.व इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रवृत्त केले.त्यांच्या या उपक्रमाचा व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिवसभर व्हायरल झाला व अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला.त्यांना मतदान केंद्रापर्यत जाण्यासाठी त्यांचे बंधु अँड आनंद पटवा यांनी सहकार्य केले.
व्हिडीओ साठी क्लिक करा????
https://youtube.com/shorts/hygsUQ4whrA?si=wZPjmvz6rIcNyOqP
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







