इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे जागतिक एड्स दिन साजरा
व्हिडीओ
https://youtu.be/D4x_H4glfGo?si=Yc4U1EIZaWTdqY8S
इचलकरंजी
एड्सचा आजाराबद्दल सामाज्यामध्ये जागरूकता वाढवण्याच्या आणि प्रतिबंधाबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक एड्स दिन एका विशिष्ट थीमवर लक्ष केंद्रित करतो या वर्षाची थीम “मार्ग हक्काचा,सन्मानाचा !” असा उल्लेख केला याच पार्श्वभूमीवर आज इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आज जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी एड्स या आजारा सामाज्यामध्ये जन जागृती निर्माण होणेकरिता रुग्णालयाच्या वतीने पोस्टर प्रदर्शन करण्यात आले.
जर प्रत्येकाला या आजाराची चांगली जाणीव असेल तर जग एड्स नाश करू शकतो. एचआयव्ही प्रतिसादात निगडित असलेली भरीव प्रगती थेट मानवाधिकारांच्या संरक्षणातील प्रगतीशी निगडित आहे.असे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ भाग्यरेखा पाटील मॅडम यांनी आपल्या मनोगातून व्यक्त केले.तसेच रुग्णालयाच्या क्षयरोगचिकित्सक डॉ रुपाली भाट मॅडम यांनी सांगितले कि प्रत्येकाच्या मानवी हक्काचे पालन हे एचआयव्हीच्या प्रभावी प्रतिसादासाठी आवश्यक आधार आहे त्यामुळे जागतिक एड्स दिन हा प्रत्येकाच्या हक्काचे रक्षण करून प्रत्येकाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कृतीचे करण्याचे आवाहन करावे यावेळी रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अमित सोहनी सर डॉ प्रकाश मोरे सर डॉ खारगे सर डॉ जितेंद्र हूपरे सर रुग्णालयाच्या सहा अधिसेविका श्रीम.सीमा कदम मॅडम रुग्णालयातील परीसेविका रुग्णालयीन अधिकारी कर्मचारी रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







