ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत, कुरुंदवाडला गळती

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत, कुरुंदवाडला गळती
इचलकरंजी
         इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करणेत येत असलेल्या कृष्णा पाणी पुरवठा योजनेच्या मजरेवाडी कडून येणारी जूनी पाण्याच्या दाबनलिकेस आज मंगळवार दि.०५ डिसेंबर रोजी  कुरुंदवाड शहरात महाराणाप्रताप चौक , कुरुंदवाड हायस्कूल जवळ गळती लागल्यामुळे इचलकरंजी शहरास होत असलेला पाणी पुरवठा आज सायंकाळी ४.०० वाजले पासून तातडीने बंद करणेत आलेला आहे.
        सदर ठिकाणची गळती काढणेचे काम महानगर पालिकेच्या वतीने तातडीने हाती घेतलेने शहराचा पाणी पुरवठा खंडीत  होणार असलेने नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. याबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगीर आहे.
सदर पाइपलाईनची गळती काढणेचे काम पुर्ण होताच शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत करणेत येईल.
 तरी शहरातील नागरिकांनी आपल्या जवळचा उपलब्ध पाणी साठा जपून वापरून महानगर पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका प्र.आयुक्त तथा प्रशासक सुषमा शिंदे यांचेकडून करणेत येत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा