सर्वच जातीतील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ-आ.राहुल आवाडे व मा.आ.प्रकाश आवाडेंचा सत्कार
इचलकरंजी:
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयामुळे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागून सर्वच जातीतील सफाई कर्मचार्यांना वारसा हक्काचा लाभ मिळणार आहे. सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणार्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशींनुसार वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या कामी पाठपुरावा करुन न्याय मिळवून दिल्याबद्दल महानगरपालिकेतील कामगार व वारसांनी आमदार राहुल आवाडे व माजी आमदार प्रकाश आवाडे यांचा सत्कार केला.
या संदर्भातील अध्यादेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 24 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केला आहे. या निर्णयाचा लाभ संपूर्ण राज्यातील सफाई कामगार कुटुंबांना होणार आहे. तत्कालीन नगरपरिषद आणि महानगरपालिकांमध्ये कार्यरत सफाई कर्मचार्यांना वारसा हक्काने नोकरीत स्थान मिळत नसल्याने अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला होता. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील विविध कामगार संघटनांच्या माध्यमातून शासन दरबारी सतत पाठपुरावा करण्यात आला. माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांनी हा प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे सविस्तर मांडत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने वारसा हक्काच्या नियुक्तीसाठी अध्यादेश जारी केला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कामगारांच्या शिष्टमंडळाने माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आभार व्यक्त केले.
यावेळी रवी जावळे, धोंडीराम जावळे, राजेश रजपुते, शांताराम लाखे, अशोक लाखे, संतोष लाखे, दत्तात्रय जावळे, विठ्ठल जावळे, संजय लाखे, शाहीर जावळे, उमेश लाखे, विजय जावळे, महादेव जावळे, अंकुश लाखे हिंदुराव जावळे जमीर जमादार, धनपाल जावळे, अरविंद खोडवी, शाहीर जावळे, अशोक लाखे, मोहन लाखे, भोपाल लाखे, प्रकाश जावळे, धोंडीराम अ जावळे, अभिजीत जावळे, भगवंत आवुधकर, आकाश लाखे उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800