एसटी बसने धडक दिल्याने विद्यार्थीनी जखमी.
इचलकरंजी
इचलकरंजी येथील व्यंकटेश महाविद्यालयाच्या पाठीमागील गेटसमोर एसटी बसने दिलेल्या धडकेत एका २० वर्षीय विद्यार्थिनी जखमी झाली. शर्वरी सदानंद भस्मे (रा. भोईनगर, शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
घटनेच्या वेळी एसटी बस (क्र. MH-14-BT-8954) चालवत असलेल्या चालक रामा लक्ष्मण काळे (रा. मानेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) याने बेदरकारपणे बस चालवताना झालेल्या अपघातात विद्यार्थिनी जखमी झाली. घटनेनंतर जखमीला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले.
घटनेची नोंद इचलकरंजी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







