युवा वर्गाने स्वामीजींच्या राष्ट्रीय विचाराचे अनुकरण करावे- अभय भंडारी
इचलकरंजीः
देशाची आजची विपरीत स्थिती विस्कळीत समाज भेदभावानी युक्त वातावरण बदलायाची असेल तर युवा वर्गाने आपल्या राष्ट्रीय बोध वाक्य ‘सत्यमेव जयते’ याची कास धरून युवा वर्गाने अंतिम क्षणापर्यंत वागावयाचे ठरवले तर भारत जगातील महासत्ता आणि विश्वाचे नेतृत्व करण्यास योग्य ठरणार आहे. असे प्रतिपादन मा. अभय भंडारी, विटा यांनी विवेकानंद जयंती-डिमिक व जागतीक युवक दिना निमित्त आयोजित व्याख्यान मालेत बोलताना व्यक्त केले. ते राष्ट्र हेच दैवत या विषयांवर वर मांडणी करत होते. स्वागत व प्रस्ताविक प्रतिक अल्लीमट्टी या मंडळाच्या कार्यकर्त्याने केली. सुरवातीलाच उपस्थित विद्यार्थी विद्यार्थीनीना खरे बोलात का असा प्रश्न विचारून भंडारीनी उत्तर विचारले. याला अपवाद वगळता बहुसंख्य विद्यार्थीनी नकारार्थी उत्तर दिले. याबाबत निराशा व्यक्त करून देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे झाली. मात्र सर्वांनी सत्याची सोडलेली कास आणि खोटेपणा अवडंबर, भ्रष्टाचाराची वाढती मानसिकता हे टाळण्यासाठी भारतीय राज्यघटना आणि लोकशाही मुल्ये यांना जिवनात आधार मानून सत्याची सवय साऱ्यांनी विशेषतः युवावर्गाने कटाक्षाने लावावी. विवेकानंदानी देशाची आजची समाजाची स्थिती बदलण्याची एकमेव शक्ती युवावर्गाच्या मुठीत आहे आणि एका सभेमध्ये भविष्यात विपरीत व संकट कालीन राजयोग येण्याची शक्यता आहे का असा प्रश्न इंग्लडमध्ये व्याख्यानात विचारला यावर विवेकानंदानी दिलेले उत्तर आजही प्रत्येक भारतीयांनी लक्षात ठेवून त्या प्रमाणेच समाजात वावरावे तसेच लोकशाहीची मुल्ये, इतिहासातील परपंरा जपण्यासाठी आपली अप्रतिम राज्यघटना ही घटना कारांची सर्व देशवासियांना मिळालेली मोफत देणगी व मुल्यवान आहे असे समजावे. याउलट पाश्चात्य देशात लोकशाहीची प्रस्थापना होवून ४०० वर्षे झाली तरी लोकशाहीत परपंरा तर टिकली, याची जाणिव ठेवून १५० कोटी लोकसख्या असलेल्या सर्व भारतीयांनी श्रमशक्ती, शुध्द चारित्र्य,परंपरागत तत्वज्ञान, क्रियाशिलता, श्रमशक्ती यांची प्रतिष्ठापना करून निराश होण्याचे कारण नाही. राष्ट्रगित सुरू असताना भारतीयांना ते संपेपर्यंत थांबण्याचे धैर्य नाही ऐनवेळी काही आठवले की आम्ही निघून जातो. बाहेर पडल्यावर राष्ट्रभक्तीच्या फुकट गप्पा मारण्यात वेळ घालवतो ही साधी गोष्ट टाळता येईल, यातच विवेकानंदाना अपेक्षीत राष्ट्रभक्ती केल्याचे समाधान मिळेल. आपली सद्सदविवेकबुध्दी समाजात वावरताना झोपी जागृत ठेवौवी, असे आवाहन शेवटी त्यांनी केले. मंडळाने आयोजित केलेल्या वकृत्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला.
गट क्रमांक १) ५ वी ते ७ वी १) अक्षरा जाधव, २) अवनी भुषण फडके, ३) विभागून १) रेवती राजेंद्र आंबोळे, आराध्या विनोद जाधव
गट क्रमांक २) ८ वी ते १० वी १) स्पंदना संतोष चौगुले, २) वैष्णवी देवरडी, ३) विभागून १) समृध्दी गणपती शिंदे, श्रेया वसवाडे, उत्तेजनार्थ गौरी संतोष गवते.
वत्कृत्व स्पर्धा १) शर्वरी उदय होगाडे २) शांभवी धनंजय कुलकर्णी ३) ऋतुजा श्रीमंत शिंदे,उत्तेजनार्थ : निलम किरण माळी.
वक्तृत्व स्पर्धा : लहान गट: १) अनुष्का अमोल शिंदे २) अवनी भूषण फडके ३) आयुष अनिल कित्तुरे ४) मयुरीदत्तात्रय भोसले.
या स्पर्धेसाठी महेश भोईर आणि दिपक होगाडे तसेच सहा. म्हणुन वृंदा दायमा, सुचिता हळदकर, किरणकुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.आभार किरण कुलकर्णी यांनी मानले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800