ICHMH51NEWS.IN
9921600800

अज्ञात दुचाकीची सायकलला धडक, वयोवृद्ध जखमी.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अज्ञात दुचाकीची सायकलला धडक, वयोवृद्ध जखमी.

शहापूर (ता. हातकणंगले)
येथे एका अज्ञात दुचाकीने सायकलस्वाराला जोरदार धडक दिल्याने वयोवृद्ध प्रदीप पांडुरंग बुलबुले (वय ६२) हे जखमी झाले.शुक्रवारी सायंकाळी  यड्राव सुतगिरणी ते सांगली नाका रस्त्यावर माने डॉक्टरांच्या दवाखान्याजवळ घटना घडली.
फिर्यादी प्रविण बुलबुले यांच्या तक्रारीनुसार, जखमी हे त्यांचे वडील असून, सायकलवरून प्रवास करत असताना अज्ञात दुचाकीचालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या सायकलला धडक दिली. या अपघातात जखमींच्या किरकोळ व गंभीर दुखापती झाल्या असून, त्यांच्यावर कोल्हापूर येथील हिरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कोरे करीत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा