अपयशाचा न्युनगंड न बाळगता आत्मविश्वासपूर्वक अभ्यास करुन परीक्षांना सामोरे जा-अप्पर मुख्य सचिव विकास खारगे
इचलकरंजी
यश-अपयश हे कायमस्वरुपी नसते. अपयशाचा न्युनगंड न बाळगता आत्मविश्वासपूर्वक अभ्यास करुन परीक्षांना सामोरे जावा. शॉर्टकर्ट मार्गाने मिळविलेले यश फार काळ टिकत नाही. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी, शिक्षक,आई-वडीलांचे स्वप्न पूर्णत्वासाठी आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रम करा, असा सल्ला मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिला.
येथील राजर्षि छत्रपती शाहू हायस्कुलमधील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना ‘परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर श्री. खारगे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मार्गदर्शन केले. या उपक्रमात शाहू हायस्कुलचे १५५ विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते. २१ फेब्रुवारीपासून १०वी च्या परीक्षेला सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री. खारगे यांनी ही संकल्पना राबविली.
याप्रसंगी मुख्याध्यापक शंकर पोवार, उपमुख्याध्यापक पी. ए. पाटील, सौ. मंदाकिनी कुंभार, राजू नदाफ, रफिक मुल्ला, शंकर पुजारी, विजय हावळ, सुनिल मांगलेकर, वसंतराव सपकाळ, टी. ए. जगताप, पी. एल. पाटील, एस. टी. पवार, एस. जी. कुंभार आदींसह माजी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







