इचलकरंजी शहराचा सर्वांगीण विकास साधणार,पाणीपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य-आयुक्त पल्लवी पाटील.
इचलकरंजी
इचलकरंजी शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध प्रश्न सोडवण्यास प्राधान्य राहणार असून लवकरच इचलकरंजी शहरात बदल झालेला दिसेल असे मत नूतन आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कामाची पद्धत स्पष्ट केली पंचगंगा नदीवर भेट दिली असून पंचगंगेतून ३० MLD पाणी उपसा आवश्यक असताना १२ MLD पाणी उपसा होतो तसेच कृष्णा योजनेतून ७८ MLD पाणी उपसा आवश्यक असताना ३५ ते ४०MLD पाणी उपसा होतो त्यामुळे शहरास पाणीटंचाई जाणवते.
त्यामुळे या दोन्ही योजना लवकरच पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करणार असून कृष्णा पाईपलाईन योजनेचे इचलकरंजी शहरातील ६५० मीटर तर जिथे सध्या गळती लागलेली आहे तेथील ११०० मीटर पाईपलाईन बदलण्याचे काम अपूर्ण असून पंधरा दिवसात काम पूर्ण करण्याच्या मक्तेदाराला आज सकाळी सूचना दिलेल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
सुळकुड योजनेसाठी तेथील आजूबाजूच्या गावाच्या नागरिकांचा विरोध असला तरी जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत समितीचा अहवाल शासनास दिलेला आहे,आणि त्या समितीच्या अहवालावर निर्णयासाठी लोकप्रतिनिधी मार्फत पाठपुरावा करणार त्याचप्रमाणे कृष्णा योजना बळकट करून त्यातून जास्त पाणीसाठा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
इचलकरंजी शहरातील स्वच्छतेबाबत १५ दिवसात शहर स्वच्छ करण्याच्या सूचना दिलेल्या असून त्यामध्ये बदल दिसेल असेही पाटील यांनी सांगितले.
इचलकरंजी शहरांमध्ये असलेल्या कुपनलिकाचा आढावा घेत त्याचे नियोजन करण्यात येइल असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या तक्रारी कमी वेळेत सोडवण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असून नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी विशिष्ट कार्यपद्धती निश्चित करण्याचे आदेश आज सर्व विभागांना दिलेले आहेत त्याप्रमाणे २४ तासापासून ते १५ दिवसापर्यत विशिष्ठ मुदतीत काम करण्याबाबत नागरिकांना कळवण्यात येईल.
नागरिकांचे हेलपाटे कमी करणार असल्याचे ही सांगितले.
कोणत्याही विभागात नागरिकांना कोणत्याही कामासाठी लागणारी कागदपत्रे एकदाच सांगावीत जेणेकरून नागरिकांचा वेळ वाचेल असे सर्व विभाग प्रमुखांना सुचवण्यात आले असून नागरिकांना भेटण्याची वेळ ही मंगळवार व शुक्रवार दुपारी ३.३० ते ५.३० असेल.सर्व उपायुक्त व अ.आयुक्त हे कार्यालयीन दिवशी सर्व नागरिकांना भेटतील. नागरिकानी विभागप्रमुख व उपायुक्त यांना केलेल्या पाठपुराव्यानंतर काम झाले नाही तर त्यासाठी आयुक्तांना भेटू शकतील त्याचप्रमाणे लवकरच एक व्हाट्सअप नंबर प्रसिद्ध करून नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावणार असल्याची त्यांनी सांगितले. सर्व उपायुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे ज्या विभागाचा कार्यभार आहे त्याचे फलक दर्शनी भागात लावणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्नास उत्तर देताना सांगितले.मक्तेदारांच्या कामाची बिले ही गुणवत्ता तपासल्या शिवाय निघणार नाहीत त्याचप्रमाणे मक्तेदाराने वापरलेल्या कच्च्या मालाची सुद्धा तपासणी केली जाणार असून पूर्ण गुणवत्ता तपासूनच बिले अदा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गावात ज्या ज्या समस्या किंवा जे बदल नागरिकांना अपेक्षित आहेत त्यासाठी त्यांनी लेखी स्वरूपात सूचना आयुक्त कार्यालयाकडे द्याव्यात त्यानुसार इचलकरंजी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक आराखडा तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यामध्ये विविध समस्या सोडवण्यावर भर राहील असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. यावेळी जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








