किशोर गटात शिवशक्ती हुपरी , किशोरी गटात जय हनुमान बाचनी विजेता तर अनिकेत फाउंडेशन हुपरी व राजमाता जिजाऊ भुयेवाडी उपविजेता,गुरुवर्य डी. एन. कौंदाडे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित किशोर किशोरी निवड चाचणी स्पर्धा
इचलकरंजी
जेष्ठ कबड्डी खेळाडू गुरुवर्य प्रा.डी. एन. कौंदाडे सर यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त बालभारत क्रीडा मंडळ येथे सुरू असलेल्या किशोर किशोरी कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत किशोर गटात शिवशक्ती हुपरी, किशोरी गटात जय हनुमान बाचनी विजेता तर अनिकेत फाउंडेशन हुपरी व राजमाता जिजाऊ भुयेवाडी या संघास उपविजेतेपद मिळाले. या स्पर्धेतून निवड झालेले खेळाडू मनमाड नाशिक येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
अत्यंत रोमहर्षक झालेल्या या स्पर्धेत किशोर गटात सेमी फायनल मध्ये शिवशक्ती हुपरी संघाने साधना म्हालसवडे संघास हरवून तर अनिकेत फाउंडेशन हुपरी संघाने हिंदवी कौलव संघास हरवून फायनल मध्ये प्रवेश केला. अंतिम सामन्यात शिवशक्ती हुपरी संघाने अनिकेत फाउंडेशन हुपरी संघावर 6 गुणांनी विजय मिळवून विजेतेपद प्राप्त केले.
तसेच किशोरी गटात सेमी फायनल मध्ये राजमाता जिजाऊ भुयेवाडी संघाने साधना म्हालसवडे संघास हरवून तर जय हनुमान बाचनी संघाने शिवशक्ती हुपरी संघास हरवून फायनल मध्ये प्रवेश केला. अंतिम सामन्यात जय हनुमान बाचनी संघाने राजमाता जिजाऊ भुयेवाडी संघावर १८ गुणांनी विजय मिळवून विजेतेपद प्राप्त केले.
स्पर्धेचा बक्षिस समारंभ डॉ.अरविंद माने यांच्या हस्ते राहुल खंजिरे यांच्या अध्यक्षतेखाली व युवा नेते सुहास जांभळे, संदीप माने, दशरथ काळे, उत्कर्ष सूर्यवंशी, कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह संभाजी पाटील,उपाध्यक्ष भगवान पवार, रमेश भेंडीगिरी, उदय चव्हाण, आण्णासो गावडे, शेखर शहा, कोल्हापूर जिल्हा पंच कमिटीचे प्रमुख रुपेश जाधव, शंकर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या स्पर्धा यशस्वी करणेकरिता बालभारत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष उल्हास सूर्यवंशी, उत्कर्ष सूर्यवंशी, आनंदा कौंदाडे, मिलिंद नवनाळे, कार्तिक बचाटे, ओंकार धुमाळ, अमोल सूर्यवंशी, अमित पाटील, योगेश कौंदाडे व बालभारत क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू तसेच पंच कमिटी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुशील चव्हाण यांनी मानले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800