ICHMH51NEWS.IN
9921600800

अशोक स्वामींच्या तत्परतेने जॅकवेल परिसरात लागलेल्या आगीवर वेळीच नियंत्रण,मोठा अनर्थ टळला

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अशोक स्वामींच्या तत्परतेने जॅकवेल परिसरात लागलेल्या आगीवर वेळीच नियंत्रण,मोठा अनर्थ टळला.

इचलकरंजी:

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा जॅकवेल परिसरात अचानक मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसून येऊ लागले. या घटनेची माहिती वरद विनायक भक्त मंदिराचे अध्यक्ष अशोक स्वामी यांना प्रवासादरम्यान मिळाली.त्यांनी तातडीने गाडी वळवून जॅकवेल परिसरात धाव घेतली.स्वामी यांनी मंदिर मंडळातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने झाडांना लागलेल्या आगीवर पाणी मारून तात्पुरते नियंत्रण मिळवले आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कळवले. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.या वेळी अशोक स्वामी यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा