अशोक स्वामींच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
इचलकरंजी
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष मा.अशोक स्वामी (आण्णा):यांच्या वाढदिवसानिमित्त दि १ एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे आरोग्य शिबिर, विध्यार्थीना खाऊ वाटप वृक्षारोपण, अनाथा निराधार मुलांना भोजन देणे गो शाळा मध्ये चारा उपलब्ध देण्यायांसह अशा विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
मा.अशोक स्वामी आण्णा यांनी प्रयत्नांची शिकस्त, नावीन्याचा ध्यास, दूरदृष्टी या त्रिसूत्रीच्या बळावर वस्त्रोद्योग उद्योग, व शैक्षणिक राजकीय क्षेत्रात भरारी घेतली आहे. याबरोबरच वाढदिवस हा फक्त निमित्त ठेवून सामाजिक कार्याला बळ देण्याचा विडा उचचला आहे.
दिनांक मंगळवार १ रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी
अरुण विद्या मंदिर येथे मुलांना खाऊ वाटप सकाळी साडेनऊ वाजता कलानगर येथील गोशाळा एक टेम्पो चारा वाटप
दु १२ वा सुदर्शन कॉलनी पुजारी मळा येथे शिवम केसरवाणी ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण व सरबत वाटप
अ . लाट येथील बालोद्यान अनाथआश्रमा येथील मुलांना सायंकाळीचे भोजन वाटप,शांतीनगर परिसर येथे प्रदीप माळगे ग्रुप कडून अशोक स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त पाणपोई चे उद्घाटन व सरबत वाटप तसेच
मोफत आयुष्यमानभारत व आभा कार्ड कॅम्प
अतिक समडोळे ई-सेवा केंद्र (जुने शिवाजीनगर पोलीस स्टेशन मनपा बिल्डिंग) येथे दोन दिवस आयोजित करण्यात आला आहे.
अशा विविध सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे माहिती अशोक स्वामी मित्र मंडळ युवा मंच यांच्या वतीने देण्यात आली

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800