नवनियुक्त नोटरी सदस्यांचा जिल्हा नोटरीज असोसिएशन तर्फे सत्कार.
इचलकरंजी..
दि इचलकरंजी बार असोसिएशन चे नोटरी नियुक्त सदस्यांचा सत्कार सोहळा कोल्हापूर जिल्हा नोटरीज असोसिएशन,कोल्हापूर यांचे वतीने अध्यक्ष ॲडव्होकेट आनंदराव जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत व बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य ॲडव्होकेट विवेक घाटगे यांचे हस्ते व इचलकरंजी बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवाल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी वरीष्ठ नोटरी वकील ॲडव्होकेट दिपक पाटील यानी नवनियुक्त नोटरी वकीलाना मार्गदर्शन केले.
यावेळी ॲडव्होकेट आनंदराव जाधव, ॲडव्होकेट विवेक घाटगे यानी मार्गदर्शन केले. सीनियर ॲडव्होकेट एम डी जमादार यांचे हस्ते नोटरी वकिलांचा सत्कार करणेत आला.
कार्यक्रमास इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष श्री.राजाराम सुतार, सचिव श्री.अभिजीत माने, सहसचिव श्री.आदित्य मुदगल, खजिनदार श्री.विजय शिंगारे, श्री. राहूल काटकर, श्री.शैलेंद्र रजपूत, श्री.महेश कांबळे, तसेच वकील संघटनेचे सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
नोटरी सत्कार प्रसंगी बोलताना नोटरी असोसिएशनचे पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







