ICHMH51NEWS.IN
9921600800

आत्मसंरक्षण हा भारतीय संस्कृतीचा गुण-समीरसिंह साळवे.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आत्मसंरक्षण हा भारतीय संस्कृतीचा गुण-समीरसिंह साळवे.

इचलकरंजी –

 कराटे या क्रीडा प्रकारातून मुलांची शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढून ते सदृढ बनतात. आत्मसंरक्षण हा भारतीय संस्कृतीचा गुण आहे. तो जोपासलाच पाहिजे. यासाठी येथील अमॅच्युअर तायक्वोंदो अकॅडमीने चालवलेली प्रशिक्षणाची सुविधा कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन इचलकरंजीचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिह साळवे यांनी केले.
येथील अमॅच्युअर तायक्वोंदो अकॅडमीच्या वतीने ‘ब्लॅक बेल्ट पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा’ पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री.साळवे बोलत होते. अध्यक्षस्थानी इचलकरंजी पॉवरलुम कापड मार्केट हौसिंग सोसायटीचे चेअरमन सर्वेश्वर भांगडिया होते.
अकॅडमीचे संस्थापक ग्रण्डमास्टर रविकिरण चौगुले यांनी स्वागत केले. युवापिढीत भित्रेपणा संपून प्रतिकाराची शक्ती वाढावी हा आमचा हेतू आहे. मुला-मुलींनी निर्भय बनावे, स्वरक्षणाबरोबरच इतरांचेही रक्षण करावे ही मूळ कल्पना यामागे आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही खेळाडूंनी नियमित सराव करावा, असे आवाहन केले. यानंतर खेळाडू मुला-मुलींनी मार्शल आर्टची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
समीरसिंह साळवे यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट विजेते खेळाडू वैभवी तोष्णीवाल, श्रीशा शिरगावे, जॉयलीन अंद्रादे, अद्विता पुजारी, रुद्र हासबे, अनीस सय्यद, प्रतिक्षा टेकाळे, ऐश्र्वया पताडे यांना प्रमाणपत्रे तर सर्वेश्वर भांगडीया यांच्या हस्ते सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. कापड मार्केट सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रप्रकाश छाजेड यांच्या हस्ते वयाच्या आठव्या वर्षी ब्लॅक बेल्ट मिळविण्याचा विक्रम करणार्‍या मंजुनाथ बिरादार आणि महेक केसवानी यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. मारवाडी युवा मंच (मिडटाऊन) च्या अध्यक्षा अनिता जैन यांच्या हस्ते अन्य प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. मान्यवर पाहुण्यांनी मुला-मुलीच्या कला गुणाचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. पालक प्रतिनिधी म्हणून चंद्रशेखर बिरादार आणि ऍड. नमिता शिरगावे यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार रामभाऊ ठिकणे यांनी सूत्रसंचालन केले. सिनियर ब्लॅक बेल्ट प्रशिक्षिका सौ. किरण चौगुले यांनी आभार मानले.
कार्यक्रमास ब्लॅक बेल्ट प्रशिक्षक महेंद्र शिंदे, रोहित सुतार, रिया चौगुले, श्रेया चौगुले, श्रेया केसवानी, विवेक अग्रवाल, प्राजू बिरादार आदि ब्लॅक बेल्टधारकांसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
फोटो-
ब्लॅक बेल्ट पारितोषिक वितरण समारंभात डीवायएसपी समीरसिंह साळवे,सर्वेश्वर भांगडीया,चंद्रप्रकाश छाजेड,रविकिरण चौगुले,किरण चौगुले  व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा