ICHMH51NEWS.IN
9921600800

भाजपा कार्यालय येथे वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रसारक, धर्मगुरू, जगतज्योती, महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भाजपा कार्यालय येथे वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रसारक, धर्मगुरू, जगतज्योती, महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी

इचलकरंजी
महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यामुळे समाजावर अनेक सकारात्मक बदल झाले. त्यांनी जातिभेद, अंधश्रद्धा आणि रूढी-परंपरांविरुद्ध आवाज उठवला, ज्यामुळे समाजात समानता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित झाला. त्यांनी ‘कायकावे कैलास’ या तत्त्वावर आधारित जीवन जगण्याचा संदेश दिला, ज्यामुळे लोकांना कामाला महत्त्व देण्यास आणि आत्मनिर्भर होण्यास प्रोत्साहन मिळालं.बसवेश्वरांनी जातिव्यवस्था आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी सर्व लोकांना समान मानले आणि कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या जाती, धर्मा किंवा सामाजिक स्थानामुळे कमी लेखू नये,असे सांगितले. अशा धर्मगुरू यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार डॉ. राहुल आवाडे, अशोक स्वामी, अरुण कुंभार, राजेश रजपुते, संजय नागरे, दीपक पाटील, महेश पाटील, नामदेव सातपुते, कोंडीबा दवडते, प्रकाश खारगे, सौ.मंगल सुर्वे, सपना भिसे सौ सीमा कमते, विजयकुमार हावळ, भानदास तासगाव, विजय कांबळे, रावसाहेब कदम, विजय पोवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अभिवादन करताना अमृत भोसले व इतर पदाधिकारी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा