इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने *महात्मा बसवेश्वर जयंती* (वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया) तिथीनुसार) आणि *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज* यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि उपायुक्त नंदु परळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी सहा.आयुक्त रोशनी गोडे,सहा.आयुक्त विजय राजापुरे, कार्यालयीन अधिक्षक प्रियांका बनसोडे, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, धनंजय पळसुले, शितल पाटील, गणेश शिंदे, सदाशिव जाधव, संपत चव्हाण, गौस जमादार, रामचंद्र कांबळे, आयुब शेख, राजु जमादार, प्रदीप झमरी, दिपक खोत, प्रविण बोंगाळे, अशोक कमते,भारत कोपार्डे , रवी केसरे , किशोर लिपारे, विनायक कांबळे आदी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







