१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त इमनपाच्या वतीने ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त मा.आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या शुभहस्ते आणि उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण समारंभ उत्साहात साजरा करणेत आला.
त्याचबरोबर आयुक्त यांचे निवासस्थानी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला.
याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहा. आयुक्त रोशनी गोडे, सहा.आयुक्त विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार, माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, प्रशासन अधिकारी इरफान पटेल, मुख्याध्यापक शंकर पोवार यांचेसह महानगरपालिकेचे विभाग प्रमुख आणि कर्मचारी महाराष्ट्र सुरक्षा दल जवान तसेच सरस्वती हायस्कूलचे विद्यार्थी , विद्यार्थीनी व शिक्षक जितेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







