ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीकडून व्यावसायिक सेवा पुरस्कार विजेत्यांची घोषणा ६ मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीकडून व्यावसायिक सेवा पुरस्कार विजेत्यांची घोषणा,६ मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ

इचलकरंजी  –
                  रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी ही शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा या विविध क्षेत्रांत समाजोपयोगी कार्य करणारी अग्रगण्य संस्था आहे. क्लबमार्फत दरवर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यावसायिकांना ‘रोटरी व्यावसायिक सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. यंदा २०२४-२५ या रोटरी वर्षासाठी निवड झालेल्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.
या वर्षी पुरस्कारासाठी खालील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे –
श्री. रमाकांत रामचंद्र वाळवेकर (केमिकल क्षेत्र), सौ. पूजा असीम कुलकर्णी ( फाऊंड्री क्षेत्र), श्री. प्रकाश शंकर निकम (गारमेंट्स क्षेत्र), श्री. निलेश कृष्णा मुसळे (केटरिंग क्षेत्र), इचलकरंजी शटललेस फॅब्रिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (संस्था क्षेत्र).  हा पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार, दिनांक ६ मे २०२५ रोजी सायं. ६.०० वाजता, रोटरी श्रीमती सोनिबाई रा. बाहेती सेवा केंद्र, दाते मळा, इचलकरंजी येथे पार पडणार आहे.
       या कार्यक्रमाला उद्योगपती मा. श्री. साईंबाल सेना (पुणे) (Founder and Managing Director of Metal Impregnations India Pvt. Ltd. आणि Teknoseal Engineering Solutions) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, असिस्टंट गव्हर्नर रो. यतिराज भंडारी (RID 3170) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
       कार्यक्रमाचे संयोजन रो. महेश दाते ( प्रोजेक्ट चेअरमन), रो. सुनील यळरुटे (डायरेक्टर – व्यावसायिक सेवा), रो. चंद्रकांत मगदूम (सेक्रेटरी) आणि रो. संतोष पाटील (अध्यक्ष) यांच्यावतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीकडून शहरातील मान्यवरांना व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा