इचलकरंजीत शिक्षकाच्या घरी घरफोडी; सुमारे ६.५४ लाखांचा ऐवज चोरीला
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील आमराई रोडवरील सिद्धीविनायक रेसीडेन्सी परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सुमारे ६ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी इचलकरंजी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी सतीश गोपाळ कुलकर्णी (वय ६२ व्यवसाय शिक्षक) यांनी दिलेल्या माहितीनुसार,७ मे च्या रात्री ८.३0 ते ८ मेच्या रात्री ९.३० या कालावधीत त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. खालील मजल्यावरील आणि मुलाच्या खोलीतील कपाटे उचकटून सोनं, चांदीचे भांडे व रोख रक्कम मिळून सुमारे ६,५४ लाखांचा ऐवज चोरून नेण्यात आला.
चोरीस गेलेला ऐवजात ७१ ग्रॅम सोन्याचे दागिने (नेकलेस, चेन, अंगठ्या) ४,९७,००० रुपये,चांदीची भांडी व पूजासाहित्य (एकूण सुमारे ३४०० ग्रॅम) १,३२,००० रुपये व रोख २५,००० रुपये असा ऐवज आहे.या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक गोंविंद कोळेकर करीत आहेत.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीक्षक समीरसिंह साळवे यांनी भेट दिली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







