इचलकरंजी न्यायालयात न्यायाधिशांचा निरोप समारंभ संपन्न
इचलकरंजी –
येथील न्यायालयात तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेले न्यायाधिशांचा निरोप समारंभ दि इचलकरंजी बार असोसिएशन तर्फे संपन्न झाला. बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी न्यायाधिश सर्वश्री मे. मंदार नेर्लेकर साहेब, बी. टी. येंगडे साहेब, डी. जी. पटवे साहेब, एम. एम. चौधरी मॅडम, एस. डी. वानखेडे साहेब, एस. एस. पेडणेकर साहेब यांचा भावपूर्ण सत्कार सिनियर अॅडव्होकेट एम. डी. जमादार, आर. व्ही. मुदगल, ए. टी. तांबे, ओ. जी. बडवे, सौ. माधुरी काजवे मॅडम यांचे हस्ते करणेत आला. मा. न्यायाधिश एम. एस. गावडे मॅडम यांचे स्वागत सिनियर अॅडव्होकेट डी. डी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला प्रतिनिधी अॅड, दिपाली हणबर यांनी केले.
मे. जिल्हा व सत्र न्यायाधिशसोो श्री. मंदार नेर्लेकर साहेब व सर्व न्यायमूर्तींनी आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले व भव्य सत्काराने भारावून गेलेचे उद्गार काढले. यावेळी सिनियर अॅडव्होकेट व्ही. बी. चव्हाण, इरफान जमादार, पवन उपाध्ये यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
सदर कार्यक्रम यशस्वी करणेसाठी दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष अॅड. राजाराम सुतार, सेक्रेटरी अॅड. अभिजीत माने, जॉईंट सेक्रेटरी अॅड. आदित्य मुदगल, खजिनदार अॅड. विजय शिंगारे, अॅड. महेश कांबळे, अॅड. राहूल काटकर, अॅड. शैलेंद्र रजपूत, महिला प्रतिनिधी अॅड. दिपाली हणबर, अॅड, संजय गजबी, अॅड. धिरज पारख, अॅड. भरत जोशी, बार असोसिएशनचे लिपीक प्रविण फगरे वगैरेंसह सर्व वकील सभासदांनी सहकार्य केले. कार्यक्रमास इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








