भरपावसात डांबरीकरण-नागरिकांच्या सतर्कतेने काम थांबले.
इचलकरंजी
शहरातील जवाहरनगर परिसरात लोकल मार्टसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ५२ कोटी रुपयांच्या कामातील रस्त्याचे काम सुरू होते,सदर रस्त्याचे कामांमध्ये भर पावसात डांबरीकरण करण्याचा प्रकार सुरू असल्याने भागातील नागरिकांनी इचलकरंजी नागरिक मंचकडे तक्रार केली व व्हिडिओ पाठवले,संबंधित व्हिडिओ इचलकरंजी नागरिक मंचद्वारे सोशल मीडियामध्ये प्रसारित करण्यात आले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांना याबाबत माहिती देण्यात आली,त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी तात्काळ काम थांबवण्याच्या सूचना दिल्या असून झालेले काम परत नव्याने करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक विभागाचे अभियंती श्री सतीश शिंदे यांनी नागरिक मंचला दिली.
शहरातील विविध प्रभागात ५२ कोटी रुपयांच्या कामांमध्ये मक्तेदारांच्याकडून हलगर्जीपणा होत असून शासनाच्या पैशाचा अपव्यय होत असल्यास नागरिकांनी त्वरित इचलकरंजी नागरिक मंचकडे तक्रार करावी असे नागरिक मंचच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी मक्तेदाराणा याबाबत कडक सूचना कराव्यात अशीही मागणी नागरिकातुन होत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







