इमनपा निवडणूक एकाच चिन्हावर लढवण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इमनपा निवडणूक एकाच चिन्हावर लढवण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय

इचलकरंजी:
 आगामी महापालिका निवडणुकीत महायुती विरोधात संघटीतपणे लढा देणे आणि त्यासाठी एकाच चिन्हावर निवडणुक लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज येथील काँग्रेस कमिटीत महाविकास आघाडीची पहिलीच बैठक झाली. यावेळी एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
           राज्यातील २२७ नगरपालिका, २८ महापालिकांसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. याबाबतच्या दाखल झालेल्या याचिकांचा विचार करून उच्च न्यायालयाने सप्टेंबर पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे आता निवडणुकीसाठी इच्छुकांनी फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुखांचीही आज काँग्रेस कमिटीत पहिली बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे, उबाठा शिवसेनेचे शहराध्यक्ष सयाजी चव्हाण, भरमा कांबळे,  बाबासाहेब कोतवाल, शिवाजी भोसले, ईस्माईल समडोळे, रणजित जाधव यांच्यासह प्रमुखांनी आपली मतं मांडली.
          प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी महाविकास आघाडी आत्तापर्यंत सत्तेच्या लालसेपोटी नव्हे तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यसाठी सदैव कार्यरत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जनतेने साध दिली आहे. त्यामुळं आता महापालिका निवडणुकीला एकसंघपणे सामोरं जाऊया. त्यासाठी आपणच गावचे राजे असल्याच्या अविर्भावात मिरवणार्‍या नेत्यांना लगाम घालण्यासाठी जनतेचे आणि स्थानिक प्रश्न घेऊन सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन केले. राहुल खंजिरे यांनी निवडणुक कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे आपली त्याला सामोरे जाण्याची तयारी हवी. लढाई करण्याची मानसिकता केल्याशिवाय यश मिळणार नाही. त्यामुळे आत्तापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन केले.
         माजी आमदार राजीव आवळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक मुद्यांवर होत असतात. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सत्ताधार्‍यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नसल्याने जनतेची कशी फसवणुक होत आहे. यासह स्थानिक मुद्दे घेऊन जनतेसमोर जाण्याचे आवाहन केले. सागर चाळके यांनी सर्व विरोधक एकत्र येऊन एकाच चिन्हावर निवडणुक लढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आपापल्या भागात चाचपणी करून कोण निवडणुक लढु क्षकतो, निवडुन येण्याची क्षमता कोणामध्ये आहे याचा सारासार विचार करून निवडणुकीला संघटीतपणे सामोरे जाण्याची तयारी करण्याचे आवाहन केले. मदन कारंडे यांनी अपयशाने खचुन न जाता जिद्दीने आणि संघटीतपणे काम करुया. त्यातून नक्कीच परिवर्तन घडेल, असा विश्वास व्यक्त केला.
         चर्चेअंती महापालिका निवडणुकीस संघटीतपणे लढा देण्याचा आणि त्यासाठी एकाच चिन्हावर ही निवडणुक लढण्यावर एकमत झाले. बैठकीस प्रकाश मोरबाळे, अब्राहम आवळे, राजवर्धन नाईक, मलकारी लवटे, प्रमोद खुडे, युवराज शिंगाडे, अभिजीत रवंदे, नागेश शेजाळे, रसुल नवाब, बिस्मिल्ला गैबान यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More