इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर धाड; १७ आरोपींवर गुन्हा दाखल, २.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी
बुधवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास इचलकरंजीतील आवळे गल्ली परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला तीन पत्ती जुगार अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला. यामध्ये एकूण १७ आरोपींना पकडण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून ५५,८०० रुपये रोख रक्कम आणि १.९० लाख रुपये किंमतीच्या पाच मोटरसायकली असा एकूण २,४५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसबहवालदार अमर हरीभाऊ कदम यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली.
तपासात असे निष्पन्न झाले की, अड्डाचालक रॉर्बट अरुण आवळे (रा. आवळे गल्ली, इचलकरंजी) याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळण्यासाठी आमिष दाखवले व शेडमध्ये एकत्र जमवून जुगार खेळ चालवला होता. याप्रकरणी रॉर्बट आवळे याच्यावर यापूर्वीही जुगारविषयक गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत प्रितम प्रकाश पाटील, राजु बापु शिंदे, सुनिल बसत कोरवी, दिनकर श्रीपती सुतके, मोहसीन मलिक बागवान, वंसत म्हाळाप्पा पुजारी, खंडु ज्ञानदेव नरुटे, अक्षय अजित पाटील, अजित बाळासो कोरवी, विशाल आप्पासो खोत, अजय भाऊसाहेब पाटील, अमोल मधुकर दाबाडे, मल्लीकाअर्जुन शंकर पानारे, सुनिल तानाजी तडाखे, उमेश चंद्रकांत मराठे, स्वप्निल तानाजी काळे यांना जुगार खेळताना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई एस. एस. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800