ICHMH51NEWS.IN
9921600800

भुयारी गटार व रस्तेकामात समन्वय ठेवा- शशांक बावचकर.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भुयारी गटार व रस्तेकामात समन्वय ठेवा- शशांक बावचकर.

इचलकरंजी
इचलकरंजी शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामात शासकीय विभागात समन्वय नसल्याचे माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
इचलकरंजी महानगरपालिकेला जुलै  २०२४  ला ४८८ कोटी रुपयाची भुयारी गटरी योजना मंजूर झाली असून ४.९७% जादा दराने म्हणजे अंदाजे ५०३ कोटी रुपयाची ही योजना इचलकरंजी शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिकेचा हिस्सा १६१ कोटी रुपये आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंगर्गत इचलकरंजी शहरातील अस्तित्वातील योजनेचे बळकटीकरण व शहराच्या वाढीव भागातील भुयारी गटार योजना तयार करण्याची निविदा प्रसिद्ध झाली असून यामध्ये सदर काम हे शहरात सुरू झालेले आहे.
 गावभाग परिसरातील ११४ किमी व इतर शहरातील २२५ किमी असे एकूण ३३९ किमी असे काम असून यासाठी शहरातील बरेच रस्ते उकरले जाणार आहेत तसेच यामध्ये  १३ एम एल डी चा एक एसटीपी प्लांट व साडे १९  एम एल डी चा एक एसटीपी प्लांट करण्यात येणार आहे. चंदुर येथे करण्यात येणाऱ्या प्रकल्पाची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे ल,सदर योजनेला १० डिसेंबर रोजी कार्यादेश देण्यात आले असून असून दोन वर्षाची पावसाळ्यासहित मुदत आहे,पाच महिने झाल्यानंतर आता सध्या काम सुरू झालेले आहे पुढे पावासाळा व सणासुदीची परिस्थिती बघता हे काम २ वर्षात पुर्ण होणे अशक्य आहे.
 इचलकरंजी शहरांमध्ये सद्यस्थितीत ५९ कोटींची कामे हि सार्वजनिक बांधकाम विभाग व  महानगरपालिका यांच्या अंतर्गत सुरू आहेत त्यातील १६६  पैकी ११९ कामे रस्ते मजबुतीकरण, बळकटीकरणं व नविन रस्त्याची आहेत. त्याचबरोबर नविन ४८ कोटी रुपयांची रस्त्याची कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. अशी एकूण १०७ कोटी रुपयांची रस्त्याची कामे होणार आहेत ही कामे करताना सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका बांधकाम विभाग महानगरपालिका पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभाग यामध्ये कोणताही समन्वय नसून जे  सद्यस्थितीत ५२ कोटी रुपयांची रस्त्याची कामे आता सुरू आहेत त्यातील बरेचसे रस्ते भुयारी गटार कामात उकरले जाण्याची शक्यता आहेत.रस्तेकामाच्या मान्यतेत भुयारी गटार योजनेत रस्ते उकरावे लागू नयेत असे नियोजन करावे असा स्पष्ट उल्लेख आहे.
याबाबत भुयारी गटार योजनेच्या कामाची सर्व माहिती नागरिकांना  महानगरपालिका प्रशासनाने द्यावी त्याचबरोबर नुकतेच केले जात असलेले रस्ते उकरले जात असतील तर ती कामे स्थगित ठेवावीत. त्याचप्रमाणे नारायण मळा येथेही नविन रस्ता उकरण्याचा प्रयत्न करणाऱ्या मक्तेदारास  नागरिकांनी मज्जाव केला आहे.भविष्यात गावातल्या बऱ्यापैकी रस्त्याची खुदाई होणार असून महापालिकेने तातडीने सार्वजनिक बांधकाम विभाग,महानगरपालिका पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभाग व बांधकाम विभाग यांची संयुक्त समिती स्थापन करून कामावर नियंत्रण ठेवावे असे मागणी शशांक बावचकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.तसेच पावसाळ्याच्या तोंडावर कोणतीही कामे करण्यात येऊ नयेत नागरिकांची सणासुदीच्या काळात गैरसोय करण्यात येऊ नये, संबंधित विभागांनी बैठक घेऊन कामाची दिशा ठेवण्यात यावी,सुरू असलेल्या रस्तेकामातील रस्ते जर उकरावे लागणार असतील ती कामे स्थगित ठेवावीत,लोकप्रतिनिधीच्या आग्रहास्तव  कोणतीही कामे गडबडीत करण्यात येऊ नयेत.
भुयारी गटार योजनेच्या कामाबाबत सर्व माहिती महानगरपालिकेने नागरिकाना द्यावी अशी मागणी बावचकर यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा