ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ,लाेकार्पण.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ,लाेकार्पण.


इचलकरंजी:
इचलकरंजी शहरातील विविध याेजना अंतर्गत ७०० काेटी खर्चाच्या विकासकामाचा शुभारंभ, लाेकार्पण, शहापूर पाेलीस ठाणे नूतन इमारतीचे उदघाटनाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे शुक्रवार २३ मे २०२५ राेजी इचलकरंजीत येत आहेत. त्याचबराेबर के.ए.टी.पी. ग्राऊंड येथे विकास पर्व सभा हाेणार आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस हे प्रथमच इचलकरंजीत येत आहेत. त्यांच्या हस्ते नगराेत्थान अभियान याेजना अंतर्गत ४८८.६७ काेटीच्या भूमिगत गटारी कामांचा शुभारंभ,१९.५ एम.एल.डी. क्षमतेच्या ९७ काेटी खर्चाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) लाेकार्पण, नगराेत्थान महाअभियान अंतर्गत ३१ काेटी खर्चाच्या नवीन सहा जलकुंभ उभारणी कामाचा शुभारंभ, मुख्यमंत्री सडक याेजना अंतर्गत ५९ काेटी खर्चाच्या काँक्रिट रस्ते बांधणी कामाचा शुभारंभ, शहापूर येथे गृह विभागार्माफत बांधणेत आलेल्या ४ काेटी खर्चाच्या शहापूर पाेलिस ठाणे नुतन इमारतीचे उद्घाटनत्याचबराेबर संजय गांधी निराधार याेजना अंतर्गत ४ हजारपेक्षा अधिक लाभाथ्यारना मंजूरीपत्राचे वाटप, ५ हजारपेक्षा अधिक बांधकाम कामगारांना गृहाेपयाेगी वस्तू संचाचे वाटप, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे मंजूर नर्सिंग काॅलेज कामाचा शुभारंभ तसेच ५ काेटी खर्चाच्या शाहू काॅर्नर ते फिल्टर हाऊस दाबनलिका बदलणे कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रथमत: शहापूर पाेलिस ठाण्याच्या नुतन इमारतीचे उद2घाटन हाेईल. त्याचठिकाणी शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ व लाेकार्पण साेहळ्याचे ऑनलाईन उद2घाटन करण्यात येईल. त्यानंतर के.ए.टी.पी. ग्राऊंड याठिकाणी विकास पर्व जाहीर सभा हाेईल. या सभेत मुख्यमंत्री महाेदय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना संबाेधित करतील. तसेच संगांयाे लाभाथ्यारना मंजूर पत्राचे वाटप आणि बांधकाम कामगारांना गृहाेपयाेगी संचाचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या सभेसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री तथा काेल्हापूर जिल्हा सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडीक, आमदार अमल महाडीक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमासाठी समस्त इचलकरंजीकरांनी के.ए.टी.पी. ग्राऊंड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार राहुल आवाडे यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, धाेंडीराम जावळे, बाळासाहेब कलागते, श्रीरंग खवरे, बाळासाहेब माने, जयेश बुगड, शशिकांत माेहिते, संजय केंगार, शेखर शहा, बाबासाे चाैगुले, राजू भाकरे आदींसह मान्यवर उपस्थित हाेते.

पत्रकार परिषदेत बोलताना आ.राहुल आवाडे,राजवर्धन नाईक निंबाळकर,धोंडीराम जावळे,श्रीरंग खवरे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा