शहापूरमध्ये युवासेनेच्या दणक्यानंतर स्मार्ट वीज मीटर बदलले..
अन्यथा कार्यालयातील स्मार्ट वीज मीटरची होळी करणार – रतन वाझे
इचलकरंजी
खाजगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून इचलकरंजी शहरांमध्ये नागरिकांच्या घरातील जुने वीज मीटर काढून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट वीज मीटर जोडण्याचा धडकाच सुरू केलेला आहे. सदरच्या स्मार्ट मीटर मुळे नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे, त्याचबरोबर नाहक त्रासाला देखील सामोरे जावे लागेल. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या स्मार्ट वीज मीटर जोडणीला विरोध करण्यात आला होता, परंतु सदरील विरोध डावलून काही खाजगी कंपन्यांचे कर्मचारी हेकेखोरपणे नागरिकांच्या घरांमध्ये जाऊन त्यांना चुकीची व अर्धवट माहिती देऊन स्मार्ट मीटर बदलण्यास भाग पाडत आहेत. *बदललेल्या स्मार्ट मीटर पैकी बऱ्याच जणांना विजबिल वाढून येणे त्याचप्रमाणे वीज मीटर ना दुरुस्त असल्यास त्याच्या दुरुस्तीचा खर्च स्वतः करणे अशा शेकडो तक्रारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाकडे येत आहेत.* यामुळे विनाकारण या समस्यांचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत आहे.
या विरोधात युवासेना इचलकरंजी शहर यांच्यावतीने समाज माध्यमांद्वारे सामान्य नागरिकांना आवाहन करण्यात आले होते, तरीदेखील खाजगी कंपन्यांचे काही कर्मचारी आज शहापूर मधील करांडेमळा या भागांमध्ये स्मार्ट वीज मीटर बदलताना आढळले. याबाबत तिथल्या नागरिकांकडून फोनवरून माहिती मिळताच युवासेना शहरप्रमुख सागर जाधव व शहरसमन्वयक रतन वाझे यांनी या भागात जाऊन खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची कान उघडणी करत प्रश्नांचा भडीमार केला असता सदरच्या खाजगी कंपनीतील कर्मचारी यांची भांबेरी उडाली व ते त्यांना विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर निरुत्तर राहिले.
यावेळी सदरच्या *कर्मचाऱ्यांना बदललेले नवीन स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवण्यास भाग पाडले आणि अजूनही जर कोणत्या नागरिकांच्या या स्मार्ट मीटर बाबतीत तक्रारी आल्यास त्यांचे मीटर तात्काळ बदलून देण्याबाबत कडक शब्दात सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या तक्रारीनंतर जर खाजगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्मार्ट वीज मीटर बसून देण्यास टाळाटाळ केली तर स्मार्ट वीज मीटर ऑफिस मधील सर्व मीटर शहापूरच्या छत्रपती श्रीशिवाजी महाराज चौकामध्ये आणून पेटवून त्याची होळी करण्याचा इशारा* यावेळी युवासेनेच्या माध्यमातून देण्यात आला.
यावेळी दूरध्वनीवरून शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांच्याशी संपर्क साधला असता, खाजगी कंपनीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याबद्दल आमचे वैयक्तिक मतभेद नसून आमचा विरोध हा स्मार्ट वीज मीटर जोडणाऱ्या खाजगी कंपनी विरोधात आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अर्धवट माहितीच्या आधारे नागरिकांचे जुने वीज मीटर बदलू नयेत अन्यथा शिवसेना स्टाईलने त्यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला.
तसेच या नवीन स्मार्ट वीज मीटर जोडणी संदर्भात इचलकरंजी शहरांमधील कोणत्याही नागरिकांच्या कसल्याही तक्रारी असतील तर त्यांनी युवासेनेची संपर्क साधण्याचे आवाहन युवासेना शहरसमन्वयक रतन वाझे यांनी केले. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख किरण गंथडे, युवासेना शाखाप्रमुख केतन कारंडे, आत्माराम कारंडे, सुरेश कांबळे तसेच भागातील नागरिक उपस्थित होते.
स्मार्ट मीटर बसवताना विरोध करताना शिवसैनिक रतन वाझे व सागर जाधव
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







