बलात्कार व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल,४ दिवसाची पोलीस कोठडी
इचलकरंजी:
इचलकरंजी पोलीस ठाण्यात एका १९ वर्षीय तरुणावर बलात्कार, धमकी आणि शारीरिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुलै २०२४ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान इचलकरंजी व कोल्हापूर परिसरात घडली.
फिर्यादी ही २५ वर्षांची महिला असून, तिची आरोपी सुरज सलीम शेख (वय १९, रा. लालनगर, इचलकरंजी) याच्याशी ओळख इन्स्टाग्रामवरून झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. आरोपीने जुलै महिन्यात फिर्यादीस आपल्या सावत्र भावाच्या मित्राच्या रूमवर बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका लॉजवरही असाच प्रकार पुन्हा घडला.फिर्यादीने विरोध दर्शविल्यानंतर आरोपीने दोघांमधील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास पोउनी श्री कोळेकर करत आहेत. तर वरिष्ठ अधिकारी मा.रोहीणी साळुंखे (उपविभागीय पोलीस अधिकारी, जयसिंगपूर विभाग) व मा. महेश चव्हाण (पोलीस निरीक्षक, इचलकरंजी) यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







