ICHMH51NEWS.IN
9921600800

काळे बंधूंना मागितली २३ लाखांची खंडणी; पोलिसात मंडपे आणि ठिकणे यांच्यावर तक्रार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

काळे बंधूंना मागितली २३ लाखांची खंडणी; पोलिसात मंडपे आणि ठिकणे यांच्यावर तक्रार

इचलकरंजी

अब्दुल लाट  येथील सामाजिक कार्यकर्ते व चैतन्य शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. दशरथ काळे आणि प्राचार्य शरद काळे यांना २३ लाख रुपये खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. विशाल मंडपे व रमेश ठिकणे या दोघांविरोधात खंडणी, बेकायदा सावकारी, ब्लॅकमेल आणि धमकीप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कोरोना काळात काळे बंधूंनी आर्थिक अडचणीत मंडपे व ठिकणे यांच्याकडून १० लाख रुपये ५ टक्के दराने घेतले होते. ही रक्कम शिक्षण संस्थेत अनामत ठेव असल्याच्या स्वरूपात दाखवून पावत्या घेतल्या. दोन वर्षे व्याज भरल्यानंतर मूळ रक्कम व व्याज मिळून एकूण १०.७५ लाख रुपये परत केले.

तरीही मंडपे व ठिकणे यांनी अजून २३ लाखांची मागणी करत विनयभंग व फसवणुकीच्या खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी दिली. याआधी फेब्रुवारी २०२४ मध्येही अशा पद्धतीने ३ लाखांची खंडणी उकळण्यात आली होती. अखेर या त्रासाला कंटाळून काळे बंधूंनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा