ICHMH51NEWS.IN
9921600800

२४ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड — शिवाजीनगर पोलिसांकडून २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

२४ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड — शिवाजीनगर पोलिसांकडून २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी:

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड करत २ लाख ३० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी एक तरुण व दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

२६ मे रोजी रात्री १ ते २ च्या सुमारास कोल्हापूर नाका, इचलकरंजी येथील गीता एजन्सीज या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी १,६०,००० रुपयांची रोख रक्कम चोरली होती. या प्रकरणी गोपीकिशन तापडिया (रा. गांधी विकास नगर, कबनूर) यांनी शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दिली होती.

पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे व त्यांच्या टीमने तपासाला गती दिली.

गुप्त माहितीच्या आधारे तपास करत असताना, आरोपी ओंकार भंडारे (वय १९, रा. कोरोची) आणि दोन अल्पवयीन मुलांना बंडगर माळ ते शाहूपुतळा रस्त्यावर मोटारसायकलवरून जाताना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी केवळ गीता एजन्सीजसह आणखी दोन ठिकाणी – एका मोबाईल शॉपी व पान शॉपमध्येही चोरी केल्याची कबुली दिली.

पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून १,२५,००० रुपये रोख, एक मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण २,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींविरोधात इतर दोन गुन्हेही उघडकीस आले आहेत.शिवाजीनगर पोलिसांच्या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीसह सपोनि विजय गोडसे व कर्मचारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा