ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत मध्यरात्री दहशत माजवत हल्ला – १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत मध्यरात्री दहशत माजवत हल्ला – १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इचलकरंजी :
 इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका कुटुंबावर हल्ला करत दहशत माजवल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ५ आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, उर्वरित १० ते १५ आरोपी अद्याप ओळख पटवली जात आहेत.
या प्रकरणी वैशाली सुनिल जाधव (वय ५५, रा. जवाहरनगर, गणपती कट्टा, इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २७ मे रोजी पहाटे १२.१५ वा. सुमारास आरोपींनी त्यांच्या राहत्या घरासमोर येऊन त्यांचा पुतण्या सुमीत जाधव याला उद्देशून अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर दहा मिनिटांनी फिर्यादी यांच्या जावई श्रीमती रंजना संजय जाधव यांच्या घरी आरोपींनी लाथा मारून दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी हातात मागाचे मारे व लोखंडी हत्यारे घेत ‘तुझा मुलगा कुठे आहे, त्याला काय ते दाखवतो’ असे म्हणत धमकावले.
दरम्यान, आरोपींनी कोरवी गल्लीतील असीफ मुजावर यांच्या रिक्षावरही हल्ला करत काचा फोडल्या व नुकसान केले.
याप्रकरणी आविनाश बाळासो कोरवी व सुरज मारुती माने,अजय कोरवी,रा.संतोष माता गल्ली, कोरवी गल्ली,इचलकरंजी गणेश आडेकर, रा. गणेश नगर, इचलकरंजी. निखिल माने, रा. कोरवी गल्ली, इचलकरंजी  तसेच इतर १० ते १५ अनोळखी आरोपी यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पो.ना. मुजावर हे करत असून प्रभारी अधिकारी पो.नि. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा