इचलकरंजी बस स्थानकात रोटरी क्लबचा उपक्रम:सुशोभीकरण, जनजागरण आणि घड्याळे भेट
इचलकरंजी:
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीने आज इचलकरंजी बस स्थानकावर एक स्तुत्य उपक्रम राबवला. यात बस स्थानकाचे सुशोभीकरण, कलर पोस्टर्सद्वारे जनजागरण मोहीम आणि प्रवाशांच्या सोयीसाठी घड्याळे बसवण्यात आली. रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील, सचिव चंद्रकांत मगदूम आणि आगार प्रमुख सागर पाटील, महादेव खारगे, सत्यनारायण धूत, सुनील यळरुटे ,मनीष मुनोत ,अजित कुरडे , स्थानक प्रमुख शिल्पा थोरात, अधिकारी वर्ग उपस्थित होते.
बस स्थानकाच्या भिंतींवर सुंदर चित्रे काढण्यात आली आहेत, ज्यात “स्वच्छता”, “धूम्रपान टाळा” आणि “शिक्षण” यांसारखे महत्त्वाचे संदेश दिले आहेत. यामुळे बस स्थानकाला एक नवा आणि आकर्षक लुक मिळाला आहे. विशेषतः, “एक एक अक्षर शिकूया, ज्ञानाचा डोंगर चढूया” आणि “तंबाखू सोडा” यांसारखे संदेश लक्ष वेधून घेतात. सदरची चित्रे रोटरी डेफ स्कूल तिळवणी येथील कलाशिक्षक श्री. व्ही. एम. होनमुर्गीकर यांनी रेखाटली आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी बस स्थानकात मोठी घड्याळे बसवण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांना वेळेचं भान राखणं सोपं जाईल. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या या उपक्रमामुळे बस स्थानकाची केवळ सुंदरता वाढली नाही, तर सामाजिक जागृतीलाही मदत झाली आहे. याबद्दल नागरिकांकडून क्लबचे कौतुक होत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







