ICHMH51NEWS.IN
9921600800

शहरातील रस्त्यांचे दर्जेदार पॅचवर्क करा-उमाकांत दाभोळे, उपाध्यक्ष भाजपा.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शहरातील रस्त्यांचे दर्जेदार पॅचवर्क करा-उमाकांत दाभोळे, उपाध्यक्ष भाजपा.

इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खडडे पडले असुन सदरच्या रस्त्यांवर शालेय विद्यार्थी, यंत्रमाग कारखान्याची वाहतुक या रस्त्याने होत असते. सदरचे शहरातील अनेक रस्ते विविध निधीतुन मंजुर आहेत
वॉर्ड नं. १३ मधील व्हदडी किरणा,लिंबु चौक,होसकल्ले हॉस्पिटल,चांदणी चौक थोरात चौक ते विक्रम नगर
महासत्ता चौक ते थोरात चौक,गांधी कॅम्प, वेताळ पेठ
होळी कटटा ते गांधी पुतळा,नारायण पेठ,वखार भाग
मोठे तळे परिसर,तीन बत्ती ते पंचवटी टॉकीज,संग्राम चौक ते घोडके नगर गोकुळ चौक,कागवाडे मळा श्री संत नामदेव मैदान परिसर याठिकाणी खड्डे पडले असून सद्यस्थितीत पावसाळयाचे दिवस सुरु झाले असलेने सदर रस्ता होणेस विलंब होणेची शक्यता असून सदर रस्त्यावर अपघात होणेचे प्रमाण वाढले आहे,याठिकाणी जिवितहानी होणेच्या अगोदर सदर रस्त्यावरील असणारे खड्ड्यांचे चांगल्या दर्जाचे पॅचवर्क तात्काळ करणेत यावे अशी मागणी उमाकांत दाभोळे यांनी आयुक्त तथा प्रशासकसो, पल्लवी पाटील इचलकरंजी महानगरपालिका, इचलकरंजी यांचेकडे  निवेदना व्दारे केली आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा