भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर मनपाचे लेखी पत्र,दोन अधिकाऱ्याना नोटीस,इनामच्या आंदोलनास यश
https://youtu.be/2iFFnUTZZMk?si=Ea84JH6PQe5gjcbT
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाविरोधात इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने गुरुवारी मनपाच्या मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीस प्रशासनाने वेळेत दखल घेतली नसल्यानं आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला.अखेर संध्याकाळी ५.१० वाजता मनपा प्रशासनाने लेखी पत्र देत सद्यःस्थितीत कार्यरत असलेल्या मक्तेदारास नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
सकाळी आंदोलन सुरु झाल्यानंतर प्रशासनाने चर्चेसाठी आंदोलनकर्त्यांना बोलावले.यावेळी उपायुक्त नंदू परळकर यांच्याशी चर्चा झाल्याने मुद्दे मान्य केले व पत्र देण्याचे आश्वासन दिले मात्र पत्र देण्यास विलंब होत असल्याने परत उपयुक्त आणि अति आयुक्त सुषमा शिंदे यांच्यासह विविध अधिकाऱ्यांशी चर्चाही झाली. मात्र, निर्बिजीकरणासाठी नविन प्रक्रिया राबवायची की सध्याच्या मक्तेदारास मुदतवाढ द्यायची,यावर प्रशासनात मतभेद होते.लेखी आश्वासन न मिळाल्याने आंदोलनकर्ते ठाम राहिले.शेवटी लेखी पत्र देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.कुत्री पकडण्याची मोहीम आज सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाला दिला झटका – निष्क्रीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर वेळेवर कारवाई न केल्याबद्दल आणि इनामच्या निवेदनावर दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार आणि मुख्य स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. २४ तासांत खुलासा न दिल्यास पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आंदोलन कर्त्यांनी विविध फलकासह कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा!
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा!
कुत्री लचके तोडत असताना प्रशासन गप्प का?सुस्त मनपा प्रशासनाचा धिक्कार असो!अशा घोषणा देत महापालिका प्रवेशद्वार दणाणून सोडले
आंदोलनात संजय होगाडे,उमेश पाटील, राम आडकी, दीपक अग्रवाल, शीतल मगदूम,अमित बियाणी,राजु कोन्नुर, राजु पारीक,दिगंबर चिल्लाळ, सोहेल शेख, नितीन ठिगळे,प्राचार्य ए. बी. पाटील,शशी सुतार,ध्रुवती दळवाई,संगीता आलासे,गोविंद आढाव,अजय रसाळ,दीपक पंडित,महेंद्र जाधव,घनश्याम भुतडा,हरीश देवाडीगा,बाळु भंडारी,संजय डाके,प्रमोद बावणे,दिनेश सोनटक्के,संभाजी सूर्यवंशी,सतीश मुळीक,नितेश पोवार,अभिजित कोणे,अमोल ढवळे,अभिजित पटवा,अमृत पारख,अमित पटवा,संजय गुगळे,सुरेश ओझा,विद्यसागर चराटे,संजय किल्लेदार, प्रकाश बोरा यांनी सहभाग घेतला.
आंदोलन करताना इनामचे सदस्य
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800










