ICHMH51NEWS.IN
9921600800

रा. प. महामंडळाचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा इचलकरंजी, वडगाव व हातकणंगले बसस्थानकांवर रंगतदार कार्यक्रम

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रा. प. महामंडळाचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..इचलकरंजी, वडगाव व हातकणंगले बसस्थानकांवर रंगतदार कार्यक्रम

इचलकरंजी:
रा. प. महामंडळाचा ७७ वा वर्धापनदिन श्री शिवतीर्थ मध्यवर्ती बसस्थानक, इचलकरंजी तसेच वडगाव व हातकणंगले बसस्थानक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तीनही ठिकाणी रंगीबेरंगी रांगोळ्या, फुलांच्या माळा व केळीच्या खांबांनी सजावट करून बसस्थानकांना आकर्षक रूप देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता लालपरीच्या पूजनाने झाली. यावेळी आगारातील अधिकारी, पर्यवेक्षक व प्रवासी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजनानंतर साखरपेढे वाटून वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी आगार व्यवस्थापक श्री. सागर पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, “रा. प. महामंडळाच्या यशामध्ये प्रवाशांचा मोठा वाटा आहे. प्रवाशांशी असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी महामंडळ नेहमीच उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करीत राहील.”
कार्यक्रमाला श्री. सुहास चव्हाण (सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक), श्रीमती शिल्पा थोरात (सहाय्यक वाहतूक अधीक्षक), तसेच इचलकरंजी आगारातील सर्व पर्यवेक्षक, चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी आणि अनेक प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्धापनदिनानिमित्त बसस्थानकात काढण्यात आलेली रांगोळी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा