ICHMH51NEWS.IN
9921600800

गॅस पाईपलाईन काम का थांबवले?- शशांक बावचकर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गॅस पाईपलाईन काम का थांबवले?- शशांक बावचकर

इचलकरंजी

इचलकरंजी शहरातील घरगुती ग्राहकांना नैसर्गिक वायू पुरवठा करण्यासाठी सुरू असलेले भूमिगत गॅस पाईपलाईनचे काम महापालिकेने थांबवले आहे. एचपी ऑइल गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने १२ कोटी ६८ लाख रुपये भरून परवानगी घेतली असून ६९.३किमी लांबीच्या पाईपलाईनसाठी महापालिकेशी करार केला आहे. मात्र १ एप्रिल २०२५ रोजी आमदार व आयुक्त यांच्या सूचनेनुसार हे काम अचानक थांबवण्यात आले.

या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही लेखी तक्रार अथवा करार उल्लंघनाचे ठोस कारण नसताना काम थांबवणे योग्य आहे का, असा सवाल माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी उपस्थित करतआयुक्तांना पत्राद्वारे खुलासा देण्याची मागणी केली आहे. त्यांनी नमूद केले आहे की, कंपनीने २३ एप्रिल रोजी परवानगीसाठी पुन्हा विनंती केली असूनही कोणताही निर्णय दिला गेलेला नाही. भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले हे काम थांबवणे हे शाश्वत विकासाला अडथळा ठरू शकते त्यामुळे तातडीने काम सुरू करावे अन्यथा केंद्र व राज्य सरकारकडे तक्रार करावी लागेल असेही त्यांनी पत्रात म्हंटले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा