पाणीटंचाईमुळे त्रस्त नागरिकांची अवस्था गंभीर; दाभोळेंकडून नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी
इचलकरंजी –
इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्ड क्र. १३ मधील दातार मळा गल्ली नं. १ व २, चौडेश्वरी मंदिर परिसर, मथूरा हायस्कूल रिंगरोड, लंगोटे मळा, आवाडे मळा, काडापूरे तळ, नरेंद्र हौसिंग सोसायटी, तांबे मळा, नाईक मळा, संतमळा, गुरुकन्नननगर मठ आणि बरगे मळा या भागातील नागरिकांना कमी दाबाने होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे शहर उपाध्यक्ष श्री. उमाकांत दाभोळे यांनी आयुक्त तथा प्रशासक, इचलकरंजी महानगरपालिका यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, सद्य:स्थितीत वापरात असलेली पाईपलाईन ही २० ते २५ वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली असून ती पूर्णपणे जुनी व जीर्ण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळत नाही.
दाभोळे यांनी महानगरपालिकेकडे या संपूर्ण भागाचा सर्वे करून नवीन पाईपलाईन तातडीने टाकण्याची मागणी केली असून, नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







