ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी शहरात प्रथमच स्वच्छ आणि सुंदर झोपडपट्टी स्पर्धेचे आयोजन-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी शहरात प्रथमच स्वच्छ आणि सुंदर झोपडपट्टी स्पर्धेचे आयोजन-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील

इचलकरंजी:
    स्वच्छ भारत मिशन, माझी वसुंधरा या शासन उपक्रमा अंतर्गत तसेच स्वच्छ,सुंदर आणि हरित आपली इचलकरंजी हा ध्यास नजरेसमोर ठेवून आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे कडून शहर स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून स्वच्छतेच्या कामकाजाचे योग्य नियोजन, वरिष्ठ अधिकाऱ्यां कडून स्वच्छता विषयक कामकाजावर देखरेख, विविध माध्यमांतून सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन, घंटागाडीच्या कामकाजामध्ये सुसुत्रता,ओला -सुका कचरा विलिनीकरण,विविध माध्यमां द्वारे शहरवासीयांची स्वच्छतेबाबत जनजागृती, घंटागाडी मध्ये कचरा न टाकता रस्त्यावर अथवा इतरत्र टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई, इतरत्र कचरा टाकणाऱ्या नागरिकाचा फोटो काढून महानगरपालिकेच्या व्हाट्सॲप क्रमांकावर पाठविणाऱ्या नागरिकास बक्षीस योजना अशा विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
  आता याही पुढे जाऊन प्रथमच आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी स्वच्छ आणि सुंदर झोपडपट्टी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये शहरातील सर्वच झोपडपट्टी सहभागी व्हाव्यात याकरिता महानगर पालिकेकडून सदर  झोपडपट्टी परिसरातील स्थानिक लोक प्रतिनिधी यांच्या सहकार्याने विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. याकरिता आयुक्त यांनी आज शहरातील विविध ठिकाणच्या झोपडपट्टी परिसरातील स्थानिक लोक प्रतिनिधी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीत लोकप्रतिनिधींनी सुचना केल्या.
Advt
  या स्पर्धेसाठीच्या नियम आणि अटी महानगरपालिकेच्या आरोग्य  विभाग आणि माहिती व जनसंपर्क विभागाकडे पहावयास मिळतील.
    स्पर्धेतील विजेत्या झोपडपट्टी मध्ये पारितोषिक म्हणून  झोपडपट्टी वासियांच्या  मागणी नुसार आवश्यक विकास कामे करणेत येणार आहेत.
   तरी शहरातील सर्व झोपडपट्टी वासियांनी स्वच्छ आणि सुंदर झोपडपट्टी स्पर्धेमध्ये असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे कडून करणेत येत आहे.
फोटो-स्थानिक माजी लोकप्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत आयुक्त पल्लवी पाटील व माजी लोकप्रतिनिधी.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा