ICHMH51NEWS.IN
9921600800

महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित मा. वसंत हंकारे यांच्या व्याख्यानास शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित मा. वसंत हंकारे यांच्या व्याख्यानास शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये शहरातील महिला व युवती यांचे करिता एखाद्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करावे या हेतूने आयुक्त तथा प्रशासक  पल्लवी पाटील यांनी शुक्रवार दि. १३ जून रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. वसंत हंकारे यांचे *’ बाप समजून घेताना’* या भावनात्मक विषयावर आधारित व्याख्यानाचे आयोजन केले होते.
Advt
          या व्याख्यानाचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते तसेच उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहा, आयुक्त रोशनी गोडे, सहा.आयुक्त विजय राजापुरे दिप प्रज्वलन करून करणेत आला.
       व्याख्याते मा.वसंत हंकारे यांनी मुली आणि आई वडील या नात्यावर हळुवार पणे फुंकर घातल्याने  उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.
कार्यक्रमाच्या समारोप करताना व्याख्यात्यांनी नाट्यगृहात उपस्थित असलेल्या काही मुलींना आणि त्यांच्या वडिलांना स्टेजवर बोलविले यावेळी स्टेजवर उपस्थित सर्वांच्या अश्रुंचा बांध फुटला आणि नाट्यगृहातील वातावरण गंभीर बनले.
            या व्याख्यानासाठी शहर आणि परिसरातील महिला युवती यांचेसह शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
यावेळी उपस्थित असलेल्या काही मुली आणि महिलांनी आपल्या भावना मांडताना इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने दरवर्षी व्याख्यानमालचे आयोजन करण्यात येते, परंतु महिला आणि युवतींना नजरेसमोर ठेवून पहिल्यांदाच अशा प्रकारे व्याख्यानाचे आयोजन केले आहे असे मत व्यक्त करुन याबद्दल आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे आभार मानले.
Advt
     यावेळी महिला बाल कल्याण अधिकारी बेबी नदाफ, भांडार अधिक्षक सुजाता दाभोळे, अनिता जैन, सदाशिव जाधव आदींसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा