ICHMH51NEWS.IN
9921600800

डी.के.ए.एस.सी कॉलेजच्या एनसीसी विभागाचे अग्निवीर मध्ये घवघवीत यश-कॅडेट सुयश चव्हाण अग्निवीरचा परेड कमांडर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डी.के.ए.एस.सी कॉलेजच्या एनसीसी विभागाचे अग्निवीर मध्ये घवघवीत यश-कॅडेट सुयश चव्हाण अग्निवीरचा परेड कमांडर

 इचलकरंजी :
येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील एनसीसी कॅडेटनी महाविद्यालयाच्या यशस्वी परंपरेला  साजेशी  कामगिरी करत ऐतिहासिक यश मिळवले आहे. महाविद्यालयाचे चार कॅडेटनी अग्निवरचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केले. याबरोबरच एनसीसी कॅडेट सुयश चव्हाण याने ८८६ प्रशिक्षणार्थी अग्नीवीर सैनिकांच्या दलाचे नेतृत्व करत परेड कमांडर म्हणून संचलन केले. त्याला बेस्ट ड्रिल चे सुवर्णपदक देखील मिळाले. नुकतीच मध्यप्रदेश राज्यातील ‘सागर’ या अग्निवीर प्रशिक्षण केंद्रामध्ये पासिंग आउट परेड संपन्न झाली. त्याच्यासोबत महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट आदित्य पाटील, आदित्य कोठावळे व प्रथमेश चव्हाण यांनी देखील यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले.  त्यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांच्या हस्ते या अग्निवेरांचा सन्मान करण्यात आला. महाविद्यालयातील एन सी सी विभागामार्फत हा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
Advt
           या अभिमानास्पद कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.खाडे यांनी अग्निवीर भरती झालेल्या एनसीसी कॅडेट्स चे अभिनंदन केले आणि आपल्या मनोगतातून त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख प्रा. लेफ्ट. विनायक भोई यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी महाविद्यालयाचे दुपार सत्र प्रमुख प्रा. डी. ए. यादव, सकाळ सत्र प्रमुख प्रा. व्ही. पी. पाटील, प्रबंधक श्री. आर. बी. जोग यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. आभार प्रा. प्रथमेश गवळी यांनी मानले. प्रा. रोहित शिंगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा