जागतिक योग दिन उत्साहात साजरा : झुंबा, प्राणायाम व ध्यान सत्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद.
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका, आर्ट ऑफ लिव्हिंग, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन राजाराम स्टेडियम येथे उत्साहात साजरा करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी अति. आयुक्त सुषमा शिंदे, उपआयुक्त नंदु परळकर उपस्थित होते.
योग प्रशिक्षक विनायक मुरदुंडे, निलेश कागीनकर यांनी योग, प्राणायाम व ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर केले. यंदा प्रथमच ‘आय एम फिट क्लब’च्या माध्यमातून झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले, ज्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पल्लवी पाटील यांनी योग हे तणावमुक्त जीवनासाठी उपयुक्त असल्याचे सांगून नियमित योगाभ्यासाचे आवाहन केले.
Advt
शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाला महापालिकेचे अधिकारी व योग संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








