ICHMH51NEWS.IN
9921600800

मराठी भाषा मनामनात रुजली पाहिजे-स्वाती राजे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी भाषा मनामनात रुजली पाहिजे-स्वाती राजे.

इचलकरंजी
येथील शिष्य संवर्धिनी प्रतिष्ठान, भाषा फाउंडेशन आणि ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २१ जून रोजी ब्राह्मण सभा हॉल, झेंडा चौक येथे शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हसत खेळत शिका भाषा या विषयावर पुणे येथील भाषा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. स्वाती राजे यांनी उपस्थित शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
   या प्रशिक्षणात मराठी भाषेचा इतिहास, तिचा संत साहित्यामुळे झालेला विकास, भाषेचा समाजावर होणारा परिणाम तसेच भाषेचे संक्रमणशील स्वरूप यावर सविस्तर चर्चा झाली. भाषा ही मनामध्ये रुजली पाहिजे, ती प्रभावी आणि गोड असावी, भाषेच्या मर्यादा ओलांडत ती सर्व स्तरांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे विचार सौ. स्वाती राजे यांनी मांडले. मराठी भाषेतील लय, ताल, गोडवा वेगवेगळ्या प्रदेशांनुसार बदलतो याचे उदाहरण त्यांनी दिले. प्रशिक्षण सत्र संवादात्मक पद्धतीने राबवले गेले आणि शिक्षकांना विविध भाषिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले गेले.
Advt
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिकेटीई शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. सपना आवाडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुरेश जोशी उपस्थित होते. या उपक्रमास विविध शाळांतील ४० शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
  शिष्य संवर्धिनी प्रतिष्ठान ही संस्था २०१४ पासून शाहुवाडी व इचलकरंजी परिसरात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, ग्रामीण भागातील शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांसाठी फिरती लायब्ररी, शालेय साहित्य वितरण, शिक्षक प्रशिक्षण असे उपक्रम राबवते. महिलांसाठी सक्षमीकरण, बचत गट निर्मिती, आरोग्यविषयक व्याख्याने, नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन असे उपक्रमही ही संस्था चालवते.
Advt
   यावेळी रमा फाटक, सुविद्या लेले, सोनाली काटकर, प्रतिभा वठारे, सुशीला हळाळे, सोनाली माळी, अश्विनी देवमोरे यांच्यासह ब्राह्मण सभेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वाती राजे यांचे स्वागत करताना रमा फाटक,सपना आवाडे व समोर उपस्थित शिक्षक
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा