ICHMH51NEWS.IN
9921600800

महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार.

इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेची आगामी निवडणुक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत शशांक बावचकर यांनी दिली.महाविकास आघाडीच्या नेत्यांचा बैठकीनंतर काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
इचलकरंजी शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,निकृष्ट रस्ते,ड्रेनेज मधील भ्रष्ट्राचार,भटक्या कुत्र्यांची समस्या,स्वच्छता याबाबतीत आम्ही एकत्रितपणे समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले,माजी खासदार राजु शेट्टी यांच्याशी बोलून त्यांनीही इचलकरंजी शहरात महापालिका निवडणूक महाविकास आघाडी मार्फत लढवण्यास सहमती दिल्याचे सांगितले.माजी आमदार राजुबाबा आवळे यांनी आघाडी करून एका चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.सागर शेळके यांनी महाविकास आघाडीची मोट बांधून महायुतीच्या विरोधात टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. यावेळी निवडणुकीकरिता उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी उदयसिंह पाटील प्रकाश मोरबाळे,संजय कांबळे,सयाजी चव्हाण,सदा मलाबदे व हेमंत वनकुद्रे यांची समिती जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर संविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक आघाडी मार्फत लढवणे व ती आघाडी निवडणुकीनंतर ही कायम ठेवणे याचा कायदेशीर अभ्यास करून पूर्तता करण्यासाठी प्रकाश मोरबाळे,संजय कांबळे व उदयसिंग पाटील यांची समिती नेमण्यात आलेली आहे.इचलकरंजी शहरात शहरातील महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेला भ्रष्टाचारी व बोगस कारभार, त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा होणारा हस्तक्षेप याचा शहरवासियाध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे जनता मतपेटीतून याला उत्तर देईल, आणि महाविकास आघाडी महानगरपालिकेची सत्ता काबीज करेल असेही त्यांनी सांगितले.इचलकरंजी शहरातील पिण्याच्या पाण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.मुख्यमंत्र्यांनी सभा घेऊन एक महिना झाला तरी याबाबत कोणती वाच्यता होत नाही,कित्येक भागात आठ दिवस पाणी येत नाही,माजलेल्या प्रशासनाला वठणीवर आणण्याचे काम महाविकास आघाडी करेल असेही बावचकर यांनी शेवटी सांगितले.
Advt
यावेळी माजी आमदार राजीव आवळे,मदन कारंडे,सागर चाळके,सयाजी चव्हाण,मंगेश कांबुरे,विजय जोशी,मलकारी लवटे,सुनील बारवाडे,बाबासो कोतवाल, अलिशा आवळे,रणजीत जाधव,राहुल खंजिरे,अमरजीत जाधव,सतीश मगदूम उपस्थित होते
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा