समाजवादी प्रबोधिनीत योग दिन साजरा
इचलकरंजी:
समाजवादी प्रबोधिनीचे प्रबोधन वाचनालय आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ” आंतरराष्ट्रीय योग दिन “साजरा करण्यात आला. यावेळी पांडुरंग पिसे यांनी स्वागत केले.प्रसाद कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले. योगगुरू विजय पवार यांनी योगाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच पतंजली योग समितीच्या योगगुरूंनी प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच दोन्ही संस्थांच्या वतीने एक जुलैपासून सकाळी ५.४५ ते ७ या वेळेत समाजवादी प्रबोधिनीमध्ये नियमित योगासन वर्ग सुरू केला जात असल्याचे जाहीर केले.यावेळी सौदामिनी कुलकर्णी ,नंदा हालभावी,कविता डांगरे, ज्योती रेवणकर, शोभा पाटील, रुपीता पांढरपट्टे ,सविता मिरजकर, संगीता वडेकर ,अर्चना सातपुते, दिव्या पटेल ,शारदा जासू ,स्नेहा परिट, प्रेमा कांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. ज्योती रेवणकर यांनी आभार मानले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







