ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने दिव्यांग व्यक्तींसाठी आरोग्य शिबिर यशस्वी; ६० लाभार्थ्यांचा सहभाग

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने दिव्यांग व्यक्तींसाठी आरोग्य शिबिर यशस्वी; ६० लाभार्थ्यांचा सहभाग

इचलकरंजी 

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन तसेच सामाजिक न्याय दिन (छत्रपती शाहू महाराज जयंती) निमित्त दिव्यांग नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर अलायन्स हॉस्पिटल, इचलकरंजी येथे घेण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन महानगरपालिका, अलायन्स हॉस्पिटल आणि इचलकरंजी केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक मा. पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीत झाला.

Advt

यावेळी उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, डॉ. समुवेल भंडारे, आयेशा राऊत (अलायन्स हॉस्पिटल), केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पाटील, सचिव शहाजी राणे, शीतल कांबळे, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

या शिबिराचा लाभ शहर व परिसरातील सुमारे ६० दिव्यांग लाभार्थ्यांनी घेतला. शिबिर यशस्वी होण्यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार आणि समाज विकास अधिकारी सुनील शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली.

दिव्यांग नोंदणीसाठी विशेष उपक्रम:
इचलकरंजी महानगरपालिका दिव्यांग नोंदणीकरिता अर्ज स्वीकारण्याचे कामकाज शनिवार, दि. २८ जून व रविवार, दि. २९ जून रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.दिव्यांग लाभार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

शिबिराचे उद्घाटन करताना आयुक्त पल्लवी पाटील,उपायुक्त नंदू परळकर व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा