इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर,उपायुक्त राहुल मर्ढेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी सहा.आयुक्त रोशनी गोडे, गणेश शिंदे, संदीप जोशी, दिपक खोत, प्रदीप झमरी, गौस जमादार सुनिल बेलेकर, अशोक कमते आदी उपस्थित होते .
फोटो
स्व.वसंतराव नाईक यांना अभिवादन करताना आयुक्त पल्लवी पाटील,सुषमा शिंदे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







